ज्येष्ठ कवी किशोर पाठक कालवश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2020
Total Views |


kishor pathak _1 &nb


नाशिक : नाशिकसह राज्यातील साहित्य विश्वात आपल्या काव्यांद्वारे एक वेगळा ठसा उमटवलेले कुसुमाग्रजांचे मानसपुत्र ज्येष्ठ कवी आणि सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष किशोर पाठक यांचे शनिवारी दि. २१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.


ते गेल्या काही काळापासून आजारी होते
. मात्र अशा परिस्थितीतही ते आजाराशी संघर्ष करीत नाशिकमधील सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान देत होते. शनिवारी कविता दिन असतानाच त्यांचे निधन झाल्याने नाशिकमधील काव्य हरपल्याची भावना अनेकांकडून व्यक्त करण्यात आली. पाठक यांचे सुमारे २८ कवितासंग्रह प्रसिद्ध झाले होते. त्यांना राज्य शासनासह राज्यातील विविध संस्थांचे पुरस्कारदेखील प्राप्त झालेले होते. ‘पालव’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रचंड गाजला होता. त्यांनी लिहिलेल्या स्त्रीविषयक कवितादेखील विशेष गाजल्या .


त्यातील ‘बेचकीत जन्मतो जीव’ या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार लाभले होते तसेच बालकवितांचेही त्यांनी विपुल लेखन केले
. नाशिकला झालेल्या ७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्यवाह म्हणून त्यांनी अत्यंत कुशलतेने धुरा सांभाळली होती.

@@AUTHORINFO_V1@@