मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, 'इयत्ता दहावीचा परीक्षेचा सोमवार दिनांक २३ मार्च रोजी होणारा पेपर रद्द करण्यात आला आहे . रद्द करण्यात आलेल्या पेपरची पुढील तारीख ३१ मार्चनंतर जाहीर करण्यात येईल' अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा सध्या सुरु आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोल विषयाचा पेपर सोमवार दिनांक २३ मार्च रोजी होणार होता. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, विद्यार्थ्यांना याचा संसर्ग होऊ नये, यासाठी हा पेपर रद्द करण्यात आला आहे. तसेच या पेपरची पुढील तारीख ३१ मार्चनंतर जाहीर करण्यात येईल. अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन दिली.