नागरिकांहो तुमच्यासाठी ! बंदला मुंबईकरांचा प्रतिसाद नाही?

21 Mar 2020 10:53:28

mumbai_1  H x W
मुंबई : मुंबई, महाराष्ट्रासह जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने अनेकांना स्वतःचे प्राण गमावले. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने गरजेच्या वस्तू सोडल्या तर इतर कंपन्या, दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. तरीही, शनिवारी सकाळी लोकल, बेस्टला गर्दी असल्याकारणाने मुंबईकरांनी हा आदेश फेटाळल्याने चित्र दिसून आले. पुणे, मुंबई रेल्वे स्थानकावर स्वतःच्या गावी जाण्यासाठी गर्दी केली आहे.
 
 
तसेच, बहुतांश खासगी कंपन्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशाचे पालन न केल्याचे दिसत आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बाजारपेठ, रस्त्यांवर तरुणांची गर्दी, असेच चित्र दिसत होते. नागपूरमध्ये शनिवारी सकाळी पोलिसांनी शहरामध्ये फिरून लोकांना सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मज्जाव केला. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी आवाहन करण्यात आले. त्यामुळे राज्य सरकार यावर काय कारवाई करणार? आणि मुंबई पूर्णपणे शटडाऊन करणार का? याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
 
 
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या एका दिवसात ५२ वरून थेट ६३वर गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमध्ये सक्तीची बंदी लागू करण्याचे आदेश दिल्यानंतर नागरिकांनी बाहेर पडू नये यासाठी जागोजागी पोलीस आणि कर्मचारी पीसीआर वॅनमधून लोकांना आवाहन करत आहे. नागरिकांनी स्वतःहून ही काळजी घेण्याची गरज असल्याची जागरूकता त्यांच्याकडून केली जात आहे.
 
 
महाराष्ट्रसह भारत सध्या तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये यासाठी केंद्रासह राज्य सारकही आटोकाट प्रयत्न करत आहेत. भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या २५८ वर गेली आहे. यामध्ये ३८ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा राज्यात सर्वात जास्त म्हणजे १४ परदेशी नागरिकांना आणि तेलंगणात ९ जणांना लागण झाली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0