काळजी घ्या! महाराष्ट्रात वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या

    दिनांक  21-Mar-2020 11:05:48
|
corona_1  H x W


महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ५२ वरून ६३ वर!

मुंबई : कोरोना विषाणूने महाराष्ट्र राज्यात प्रवेश केल्यानंतर हळूहळू आपले प्रस्थ वाढवायला सुरुवात केली आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात असून त्यात अजून नव्या रुग्णांची भर पडली आहे. पुण्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण सापडल्याने आता पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ झाली आहे. या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण आर्यलँडहून परत आला होता. तर दुसरा रुग्ण स्थानिक आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हा दंडाधिकारी नवल के. राम यांनी दिली आहे.


कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सज्ज असून ३१ मार्चपर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद राहणार आहे. तसेच उद्या २२ मार्च रोजी देशात 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आले आहे


कालपासून कोरोनाचे ११ नवे रुग्ण सापडले असून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आता ६३ झाली आहे. मुंबईतही कोरोनाग्र्स्तांची संख्या १०वर पोहोचली आहे. कोरोनाचा संसर्ग हा खोकला, शिंक, थुंकी यातून होत असल्याने वैयक्तिक स्वच्छतेबरोबच सार्वजनिक स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरा. रस्त्यावर थुकू नका, अशा सूचना आरोग्य विभागाकडून वारंवार देण्यात येत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.