"फुल्ल सपोर्ट ! छत्रपतींची बदनामी करणाऱ्यांचा असाच बंदोबस्त व्हायला हवा"

20 Mar 2020 15:09:06
Jitrndra Raut _1 &nb


मुंबई
: सोशल मीडियाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या जितेंद्र राऊत या इसमाला शिवप्रेमींनी चांगलाच चोप दिला. गेले काही दिवस छत्रपतींबद्दल वारंवार आक्षेपार्ह पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा व्यक्ती करत होता. मात्र, शिवप्रेमींनी त्याचा शोध घेऊन त्याची धींड काढली. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपतींनी याबद्दल संबंधित शिवप्रेमींचे अभिनंदन केले आहे. 










खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहीत असंख्य शिवप्रेमींचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, "फुल्ल सपोर्ट! `विमानातून बाहेर आलो आणि मोबाईल मध्ये शिवभक्तांनी छत्रपती घराण्याची बदनामी करणाऱ्या इसमाला चोप दिलेले व्हिडीओ पाहायला मिळाले. माझ्या सुद्धा मनातली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटले. अश्या प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त जागीच केला तर दुसरा कुणी धाडस करणार नाही. मी कायदा मानणारा, कायद्याचे पालन करणारा, शिवरायांचा वंशज आहे. पण ह्या प्रकरणात माझा सुद्धा संयम सुटला होता. मी त्या सर्व शिवभक्तांच्या पाठीमागे ठाम उभा आहे ज्यांनी कामगिरी केली. माझ्यासारखे कोट्यवधी शिवभक्त तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. ही मोहीम फत्ते करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे मनापासून अभिनंदन! जय शिवराय, जय शंभूराजे."


राऊत याने यापूर्वी सोशल मीडियाद्वारे बऱ्याच दिवसांपासून छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, पोस्ट टाकल्या होत्या. शिवप्रेमींबद्दल प्रचंड राग होता. शुक्रवारी सकाळी राऊत याला ताब्यात घेत त्याला बेदम चोप देण्यात आला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ त्याच्याच फेसबूक अकाऊंटद्वारे पोस्ट करण्यात आला होता. फेसबूक लाईव्ह करत गावातून त्याची धिंड काढण्यात आली होती.




Powered By Sangraha 9.0