‘कोरोना’मुळे इटलीत हाहाकार!

    दिनांक  20-Mar-2020 14:09:46
|
italy_1  H x W:
इटलीत आतापर्यंत सर्वाधिक, ३४०५ लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस जगभरातल्या १७९ देशांमध्ये फैलावला असून जवळपास २ लाख ४५ हजारांहून अधिक लोक कोरोनाबाधित झाले आहेत, तर तब्बल १० हजारांवर लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाबाधित देशांमध्ये इटलीला सर्वाधिक फटका बसला असून कोरोनामुळे मृत्युच्या संख्येत इटली आता चीनच्या पुढे गेला आहे. इटलीमध्ये ३४०५ जणांचा मृत्यू झाला आहे.


इटलीत २४ तासांत ४२७ जणांचा बळी गेला आहे. चीनमध्ये आतापर्यंत ३२४९ जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यानंतर इराणमध्ये १२८४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये ८३१ जण कोरोनामुळे दगावले आहेत. २४ तासांत स्पेनमध्ये २९४ जणांचा बळी गेला. फ्रान्समध्ये ३७२ जण मृत्युमुखी पडले. दक्षिण कोरियात ९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


अमेरिकेतील सर्व राज्यांतही कोरोना फैलावला आहे. अमेरिकेत २११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोना अधिक फैलावतो आहे. काही दिवसांत भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागेल, असा इशारा न्यूयॉर्कच्या महापौरांनी तिथल्या नागरिकांना दिला आहे.


कोरोना व्हायरसचा फैलाव वेळीच रोखला नाही तर जगभरात लाखो लोक मृत्युमुखी पडतील. विशेषतः गरीब देशांमध्ये परिस्थिती गंभीर होईल, असा धोक्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँन्टोनिओ गुतरेस यांनी दिला आहे. कोरोना रोखण्यासाठी जगतिक समन्वयाचे आवाहन त्यांनी केले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.