महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला

    दिनांक  20-Mar-2020 12:10:08
|
corona_1  H x W


 
महाराष्ट्रात तीन नवे कोरोनाग्रस्त; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्रात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दिवसेंदिवस नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ४९ वरुन आता ५२ वर पोहचली असल्याचे स्पष्ट केले आहे. तर राज्यात कोरोनाचे ३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची माहिती त्यांनी दिली. दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधत येत्या २२ मार्चला जनता कर्फ्यू असणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजेश टोपे यांनी सुद्धा राज्यातील नागरिकांना येत्या रविवारचा कर्फ्यू १०० टक्के पाळा, असे आवाहन केले आहे.


राज्यात डायग्नोस्टिक सेंटरची संख्या वाढवणार असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राकडून मदतीची अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. तर आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. दुसऱ्या बाजूला पाच कोरोनाचे रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर असल्याचे ही टोपे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. खासगी रुग्णांन क्वारंटाईनची व्यवस्था आणि कोरोना किटची संख्या सुद्धा वाढवण्यात येणार आहे. सरकारकडून वारंवार कोरोनाबाबत उपाययोजना केल्या जात आहे. पण नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.