मनालाच कळवा, ‘कोरोना’ला पळवा!

    दिनांक  20-Mar-2020 22:46:18
|


corona_1  H x W


If you can't go outside... Go inside’-
जर तुम्ही बाह्यजगात जाऊ शकणार नाहीत, तर अंतर्मनात जा...! फार गांभीर्यपूर्वक, सृदृढतेसाठी ‘मन’ किती महत्त्वाचे आहे, हे विशद करणारे ‘शीघ्र रेखाटन’ आहे.


सध्या देशातच नव्हे, तर सार्‍या जगात ‘कोरोना’ विषाणूने थैमान घातलेले आहे. जगावर व्यावसायिक उत्पादनांच्या बाबतीत प्रभाव टाकणारा चीन, जगावर ‘अशाही’ प्रकारे विचित्र प्रभाव टाकेल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. चीनमधील ‘वुहान’ शहराची ‘कोरोना’ बरोबरची ओळख जगाच्या नकाशावर निर्माण झाली.‘कोरोना’ विषाणूपेक्षाही विषारी असलेली ‘अफवा’ नावाची लस अधिक भीती निर्माण करते आहे. ही भीतीदायक बाब सध्या जगाला भेडसावत आहे. हे भयाण वास्तव मन विषण्ण करणारं आहे. या ‘कोरोना’वर अनेकांनी अनेक प्रकारे विश्लेषणे केलेली आहेत. ‘कोरोना’वर आपल्यातील जवळजवळ सगळेच जण भरभरून बोलतील, तज्ज्ञ असल्याप्रमाणे मतदेखील नोंदवतील, अगदी सल्लादेखील देण्याचं निरागस धाडसही करीत असतील. या लेखामध्ये ‘चित्रकला आणि कल्पकता’ या माध्यमांनी ‘कोरोना’ या विषाणूने निर्माण केलेले विषण्ण वातावरण जरा हलकं करण्याचा प्रयत्न केलेला हा प्रयत्न...corona_1  H x Wकुठलीही गंभीर बाब
, त्या घटनेचं गांभीर्य अबाधित ठेवून कल्पक चित्रांकनाच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात व्यक्त करण्याचा प्रयत्न केल्यास, मनावरील ताण कमी होतो आणि जो संदेश देण्यात आलेला आहे, तो ‘स्मृतीप्रवण’ देखील ठरतो. एक सुंदर चित्रांकन आहे, त्यात एका जुन्या लाकडांच्या पट्ट्यांचा दरवाजा, ज्यावर भारताचा नकाशा आहे, तो दरवाजा पाठमोर्‍या पेहेरावावरून, भारताचे पंतप्रधान, त्यांच्यासोबत आबालवृद्ध जोरात ढकलत असून दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने होणार्‍या ‘कोरोना’च्या रेट्यातून एक-दोन ‘कोरोना’ विषाणू आत पडले असून बाकीच्यांना आत शिरकाव करू न देण्याचा हे प्रयत्न करीत आहेत. फार बोलके असे, रंगीत चित्रांकन आहे हे. एक क्लिपार्ट फारच सुंदर आहे. एक अवखळ मुलगा, बेसिनमध्ये ‘सॅनिटायझर’ने हात धुवत आहे.त्याच्या चेहर्‍यावरून विजयी आनंद ओसंडून वाहताना दिसतो आहे
. फारच सकारात्मक परिणाम करणारे हे ‘क्लिपार्ट’ आहे. एक ‘रॅपिड स्केच’ तर फारच ‘कल्पनारम्य’ आहे. अत्यंत प्रभावी आणि गूढ संदेश त्या ‘स्केच’वरून देण्यात आला आहे. ते स्केच एका ‘ध्यानस्थ’ व्यक्तीचे ‘शीघ्र रेखाटन’ आहे आणि म्हटलेले आहे. ‘If you can't go outside... Go inside’- जर तुम्ही बाह्यजगात जाऊ शकणार नाहीत, तर अंतर्मनात जा...! फार गांभीर्यपूर्वक, सृदृढतेसाठी ‘मन’ किती महत्त्वाचे आहे, हे विशद करणारे ‘शीघ्र रेखाटन’ आहे. काहींनी राजकीय विषयांनाच ‘क्वारंटाईन’ करण्याचा चपखळपणे मांडण्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक ‘कोरोना’च्या संदर्भात राजकीय विषय संबंध नसावा परंतु, ‘बुरा न मानो होली है,’ म्हणून जसं वाईट वाटून घेतलं जात नाही (?) तद्वतच राजकीय टिप्पणी करणारी रेखांकने व्यंगचित्रे देखील आपण ‘लाईटली’च घेऊ या...!!


-गजानन शेपाळ 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.