विश्वशांतीसमोरील आव्हाने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2020   
Total Views |


world peace_1  



‘इसिस’च्या बाबतीत त्याचे पसरत चालेले लोण धोकादायक आहे. ‘कोविड-१९’ इतकाच धोकादायक हा आजार आहे. आंतराष्ट्रीय व्यासपीठे, संस्था-संघटना याबाबतीत भूमिका घेणार का, असाही सवाल केला गेला पाहिजे. असे दहशतवादी प्रकार बंद होऊन सगळेच धर्मसमुदाय जागतिकतेला प्राथमिकता देतील, अशी स्थिती आणली पाहिजे.



अमेरिकेत नुकतीच मोहम्मद मसूद नावाच्या पाकिस्तानी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे
. मोहम्मद मसूद हा व्यक्ती ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेला मदत करीत होता. १६ मार्च रोजी विमानाने हा इसम सीरियाला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, कोरोनाने घातलेल्या गोंधळामुळे त्याला पकडण्यात अमेरिकी यंत्रणेला यश आले आहे. अमेरिकेसारख्या देशात इस्लामिक दहशतवादाविषयी कमालीची सतर्कता पाळली जाते. तिथेही अशाप्रकारे २८ वर्षीय तरुण डॉक्टर काही दिवस राहून हल्ल्याची योजना बनवून जाऊ शकत असेल, तर इतर देशांची स्थिती काय असावी, यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. भारतासारख्या देशात तर तपासाच्या नावाने सगळी बोंब आहे. सुरक्षेचे कोणतेही गांभीर्य आपल्या देशातील लोकांना राहिलेले नाही, हे कित्येक घटनांवरुन सांगता येईल. पण, निश्चितच मोदी सरकारच्या काळात सरकारी पातळीवर यामध्ये बदलाची सुरुवात किमान झालेली दिसते.



मोहम्मदच्या बाबतीत त्याने
‘इसिस’प्रति घेतलेली शपथ इत्यादी पुरावे अमेरिकी यंत्रणेकडे आहेत. भारतात अशा डिजिटल माध्यमातील पुराव्यांना ‘पुरावे’ म्हणून मान्यता नसली पाहिजे, असे मत बाळगणारे महाभाग आहेत. विशेष म्हणजे, अशा सगळ्यांकडे अभिव्यक्त होण्यासाठी तगडे व्यासपीठ आहे. ‘अर्बन नक्षल’ प्रकरणात झालेल्या अटकेनंतर असे पुरावे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. त्यावर अनेक कथित पत्रकार, डावे विचारवंत तुटून पडले होते. अमेरिकेचे राष्ट्रीय भाग्य या बाबतीत चांगले म्हटले पाहिजे. त्यांच्याकडे असे उन्मादी उदारमतवादी नाहीत.



मोहम्मद मसूदने
‘इसिस’मध्ये सहभागी होण्याचे मनसुबे अनेकांजवळ बोलून दाखवले होते. त्याचाही आधार अमेरिकच्या तपासयंत्रणांनी घेतला आहे. मोहम्मद मसूद हा कोणी अशिक्षित-अडाणी धर्मांध नाही. डॉक्टरकीची पदवी मिळवलेला माणूस आहे. तरीही ‘इसिस’सारख्या संघटनेत सहभागी होण्याची इच्छा त्याला होते. शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने हे प्रकार बंद होतील, हा आशावाद मसूदसारखे लोक खोटा ठरवतात. प्रश्न केवळ एका मोहम्मद मसूदचा नाही, तर असे किती तरुण, उच्चशिक्षित ‘इसिस’च्या जाळ्यात अडकत असतील. इतक्या सुंदर जगाला दहशतवादी हल्ल्याने हादरवून सोडण्याची स्वप्ने पाहत असतील. ‘इसिस’ची ताकद यामुळे किती वाढत जाणार आहे. ‘इसिस’ला वेसण घालण्याची जबाबदारी कोण पार पाडणार, असे हजारो प्रश्न आज मानवजातीसमोर आहेत.



इस्लामिक दहशतवाद’ हा जागतिक प्रश्न आहे. आज कोरोनाच्या विरोधात लढताना जसे सारे जग एकत्र आले आहे, त्याच पद्धतीने ‘इसिस’सारख्या प्रश्नाला जागतिक प्राथमिकतेचा विषय बनवले पाहिजे. कारण, दहशतवाद हा धर्माचा नसला तरी त्याची प्रेरणा धर्म ठरतो आहे. सामाजिक व्यवस्थेने धर्मावर घातलेले निर्बंध हा त्यावरील उपाय ठरू शकेल. धर्माच्या नावाखाली लोक काय घोकतात, काय ऐकतात व काय पाहतात, याचे मूल्यमापन व्हायलाच हवे. ‘गजवा-ए-हिंद’,‘दार-उल-अरब’,‘दार-उल-इस्लाम’ अशा संकल्पनांचा आजही प्रचार-प्रसार केला जातो. त्यातूनच असे मसूद जन्म घेतात. केवळ सुरक्षेचा प्रश्न म्हणून याची हेटाळणी करता येणार नाही. एका उच्चशिक्षित तरुणाला ‘इसिस’चे आकर्षण वाटत असेल तर याचा विचार सार्‍या जगाने करायला हवा.



जगभरात अनेक समुदाय
, पंथ, धर्म आहेत. देश-काल-परिस्थितीनुसार अन्याय अत्याचारसुद्धा झाले. पण म्हणून कोणाच्याही पिढ्याच्या पिढ्या दहशतवादी झालेल्या नाहीत किंवा संबंधित अस्मितेच्या आधाराने कोणताही दहशतवाद पोसला जात नाही. असे प्रयत्न अनेक ठिकाणी, अनेक पंथसमुदायांच्या बाबतीत झाले. मात्र, अस्मितेच्या छायेखाली इतक्या तीव्रतेने कधीही दहशतवाद फोफावलेला नाही. ‘इसिस’च्या बाबतीत त्याचे पसरत चालेले लोण धोकादायक आहे. ‘कोविड-१९’ इतकाच धोकादायक हा आजार आहे. आंतराष्ट्रीय व्यासपीठे, संस्था-संघटना याबाबतीत भूमिका घेणार का, असाही सवाल केला गेला पाहिजे. असे दहशतवादी प्रकार बंद होऊन सगळेच धर्मसमुदाय जागतिकतेला प्राथमिकता देतील, अशी स्थिती आणली पाहिजे. जागतिक राजकरणात मात्र दुसर्‍या देशांना ‘चेकमेट’ करण्यासाठी एक प्यादा म्हणून कट्टरपंथी वापरले जातात, हे दुर्दैवी...

@@AUTHORINFO_V1@@