कोरोनाबाधित असल्याचे लपवून या गायिकेने आयोजित केली पार्टी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2020
Total Views |
kanika _1  H x


पार्टीत लखनऊचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि नेते मंडळी सहभागी!


लखनऊ : बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका, ‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. ती १५ मार्च रोजी लंडनहून लखनऊला आली होती. विमानतळावरील ग्राउंड कर्मचार्‍यांची नजर चुकवून ती वॉशरूममध्ये लपून राहिली आणि काहीवेळाने संधी साधून तिथून पसार झाली. त्यांनतर तिने लखनऊच्या गॅलंट अपार्टमेंटमध्ये रविवारी एका पार्टीचे आयोजन केले. या पार्टीत लखनऊमधील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि नेते मंडळी हजर होती. मात्र आज ही घटना उघडकीस आल्यापासून संपूर्ण अपार्टमेंट खळबळ उडाली आहे.




कनिकाचा वावर झालेल्या परिसरातला प्रत्येकजण घाबरला आहे. सोसायटीतले रहिवासी आणि पार्टी कॅटरर्सदेखील घाबरले आहेत. शालिमार गॅलंटच्या या अपार्टमेंटमधील बहुतेक रहिवासी आता ही इमारत सोडून इतर ठिकाणी जात आहेत. कनिका कपूर आपल्या कुटुंबांसमवेत या इमारतीत राहते. मात्र ती कोरोनबाधित असल्याचे लक्षात आल्यापासून तिच्या कुटुंबाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाने कनिकाच्या संपर्कात असलेल्या सर्व लोकांना बोलावले आहे आणि त्यांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.


मात्र कानिकाच्या या कृतीमुळे सगळ्याच स्तरांतून तिच्यावर टीकेची झोड उठत आहे. शिवाय विमानतळावरून सिक्युरिटी चेक चुकवून तिथून निसटल्यामुळे विमानतळ सुरक्षेवरही प्रश्न चिन्ह लावले जात आहे. गायिका कणिका कपूरवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही सगळ्यांकडून केली जात आहे.


@@AUTHORINFO_V1@@