कोरोना तपासणीसाठी आता खासगी रुग्णालयेही सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2020
Total Views |
Bombay _1  H x
 
 

विलगीकरणासाठी खाटांची सुविधा

 

मुंबई : कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांचा ताण कस्तुरबा रुग्णालयावर येऊ नये यासाठी मुंबईतल्या खासगी रुग्णालयातही रुग्णांच्या विलगीकरणासाठी खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येत्या दोन- तीन दिवसांत तेथे तपासणी सुरु केली जाईल. पालिकेने तशा प्रकारची परवानगी दिली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
 
परदेशातून मुंबईत येणा-या प्रवाशांची तपासणी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केली जाते आहे. त्यासाठी डॉक्टरांची टीम दिवसरात्र तैनात करण्यात आली आहे. तपासणीनंतर संशयित रुग्णांना तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जाते. त्यासाठी आयसोलेशन वॉर्डही तयार करण्य़ात आले आहे. येथे निदानासाठी चाचण्यांची सुविधाही उपलब्ध आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये निगराणीखाली
ठेवले जाते.
 
 
कोरोना लक्षणे नाहीत, मात्र रुग्णांच्या संपर्कात आले आहेत अशा रुग्णांना होम क्वारंन्टाईनमध्ये ठेवले जाते. रुग्णांची संख्या लक्षात घेता पालिकेच्या रुग्णालयावर याचा ताण येऊ नये यासाठी आता मुंबईतील काही खासगी रुग्णालयातही तपासणी केली जाणार आहे. खासगी रुग्णालय चालकांसोबत पालिकेने याबाबत बैठक घेऊन उपाययोजना केल्या आहेत. येथे रुग्णांच्या चाचण्याही केल्या जाणार आहेत. आयसीएमआरने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार या चाचण्या होतील. पालिकेने तशी परवानगी दिली आहे. येत्या दोन- तीन दिवसांत या सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाच्या उपअधिकारी दक्षा शहा यांनी दिली.
 
 
डॉक्टरांचे प्रशिक्षण
 
खासगी रुग्णालयात कोरोना तपासणी सुविधा उपलब्ध करण्यापूर्वी तेथील डॉक्टरांना पालिकेकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. तपासणी व इतर प्रक्रियाबाबत माहिती देण्यात आली आहे.
 
 
खासगी रुग्णालयांतील खाटांची सुविधा
जसलोक -- ५ खाटा
एच. एन. रिलायन्स रुग्णालय - २ खाटा
हिंदुजा, माहिम - २० खाटा
कोकिलाबेन - १७ खाटा
रहेजा रुग्णालय -- १२ खाटा
जगजीवन राम वेस्टर्न रेल्वे - १० खाटा
गुरुनानक रुग्णालय -- २ खाटा
सेंट इलिझाबेथ रुग्णालय -- २ खाटा
बाँबे रुग्णालय -- ४ खाटा
लिलावती -- १५ खाटा
@@AUTHORINFO_V1@@