उल्हासनगरमध्ये दुबईहून परतलेल्या महिलेला कोरोनाची लागण

    दिनांक  19-Mar-2020 11:46:33
|
Covid-19_1  H x
 


मुंबई : उल्हासनगरमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. दोन्ही कोरोना रुग्णांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. उल्हासनगरच्या एका ४९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला दुबईतून प्रवास करून आली होती.


 
विमानतळावर तिची तपासणी करण्यात आली, त्यावेळी तिला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईतील एका २२ वर्षीय तरुणीलाही करोनाची लागण झाली. ही तरुणी ब्रिटनहून आली. तिच्यावरही विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली. देशात कोरोना रुग्णांची संख्या १७१ वर पोहोचली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.