कोरोनाची दहशत : ऑस्ट्रेलियातून आलेल्या नागरिकांना डोंबिलीकरांनी रोखले

18 Mar 2020 17:55:29
Dombivali_1  H





कोरोनाची तपासणी निगेटीव्ह आल्यानंतरही नागरिकांना विरोध



डोंबिवली : डोंबिवलीत एक व्यक्ती ऑस्ट्रेलियातून आल्यावर आपल्या राहत्या घरी आले होते. मात्र त्या इमारीतीतील रहिवाश्यांनी त्यांना राहण्यास नकार दिला. डोंबिवली रामनगर पोलिसांनी यात मध्यस्थी घेत ऑस्ट्रेलियातून आलेल्या नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलावले. 


विमानतळावर आपली वैद्यकीय तपासणी केल्यावर कोरोना झाला नसल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, रहिवाशांचा संताप पाहता पोलिसांनी सदर व्यक्तीस काही दिवसाकरता डोंबिवलीत राहू नका, पुन्हा एकदा मुंबईतील कस्तुरबा रूग्णालया तपासणी करा, असा सल्ला दिला. सदर व्यक्तीने दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनी सुरेश आहेर यांनी दिली. 



कोरोना विषाणूमुळे जगात सर्तकता बाळगली जात असताना असेही प्रकार उघडकीस येत आहेत. परदेशातून आलेल्या एखाद्या नागरिकाची पूर्ण तपासणी केल्यानंतर योग्य ती खबरदारी घेतल्यावर त्याला कमीत कमी २ आठवडे आपल्या घरी राहावे, कोणाच्याशी संपर्कात राहू नये असे आदेश राज्य सरकारने दिले आहे. दरम्यान, डोंबिवलीत परदेशातून आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करा, त्याला कोरोनाची लागण झाली आहे का ते तपासा असे अनेक नागरिक डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात सांगण्यास येत असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक विलास जोशी यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0