इस्लामी तीर्थ यात्रेसाठी गेलेले नागरिक कोरोनाची शिकार ?

18 Mar 2020 14:09:58
Iran _1  H x W:


तेहरान : इराणमध्ये मजहबी तीर्थयात्रेसाठी २३४ भारतीयांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर वैद्यकीय चाचण्या करून झाल्यानंतर तिथेच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. जेव्हा ते संपूर्ण बरे होतील तेव्हाच त्यांना भारतात आणण्यात येणार आहे. इराणमध्ये कोरोना विषाणूने महामारीचे रुप घेतले आहे. आत्तापर्यंत तिथे ७२४ लोकांनी आपला जीव गमावला आहे. १५ हजार जणांना याची बाधा झाली आहे. 
 
 
इराणमध्ये अडकलेल्यांची संख्याही अडीचशेहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही आकडेवारी अधिकृत आहे का याबद्दल साशंकता आहे. सरकारतर्फे याबद्दलचा अधिकृत आकडा सांगण्यात आलेला नाही. मात्र उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आयएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत ही आकडेवारी उघड झालेली आहे. या यात्रेवर गेलेले बरेचसे जण हे वरिष्ठ नागरीक आहेत. या सर्वांना आंतरराष्ट्रीय निर्देशांनुसार, या सर्वांना विलगीकरण कक्षातच ठेवले जाणार आहे.
 
 
इराणमध्ये अजूनही विविध भागांमध्ये राहणारे सहा हजार भारतीय अडकल्याची भीती आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख येथील इस्लाम यात्रेवर जाणारे भाविक, केरळ, गुजरात, तमिळनाडू आदी भागातील मासेमार आणि काही विद्यार्थीही इथे अडकले आहेत.
Powered By Sangraha 9.0