धक्कादायक ! परदेशातील २७६ भारतीय कोरोनाग्रस्त

18 Mar 2020 15:57:51

corona_1  H x W



नवी दिल्ली
: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, परदेशात वास्तव्यास असणाऱ्या २७६ भारतीयांना कोरोना संसर्ग झाला असल्याची पुष्टी केली आहे. सध्या देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. एकट्या इराणमध्येच तब्बल २५५ भारतीय कोरोनाग्रस्तअसल्याचे वृत्त समोर आले आहे.






सध्या भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा १४९ पर्यंत पोहोचला असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात इराणमध्ये अडकलेल्या २५५ भारतीयांची कोरोना व्हायरसची तपासणी करण्यात आली. यामध्ये ही सर्वजण कोरोना बाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने इराणमधील २५५ भारतीयांना कोरोनाची बाधा झाल्याच्या बातमीची पृष्टी केली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचा आकडा काढला तर २७६ भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. यानुसार यूएईमध्ये १२ , इटलीत ५ , हाँग-काँग, कुवेत, रवांडा आणि श्रीलंकात प्रत्येकी एक भारतीयाला कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये काही विद्यार्थी तर काही प्रवाश्यांचा सहभाग आहे. 
Powered By Sangraha 9.0