महापालिका आपत्कालीन कक्षात ‘हेल्पलाईन’ सुरू करा

17 Mar 2020 20:59:19


corona helpline _1 &


मुंबई : कोरोनाची तपासण्या करणारी अधिकची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच महापालिका आपत्कालीन कक्षात स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनाच्या तपासण्या करणारी यंत्रणा मुंबई शहर व उपनगरात ठिकठिकाणी उपलब्ध करून दिल्यास संशयित रुग्णांना वेळीच तपासण्या करून घेणे शक्य होईल. तसेच खाजगी लॅबना तपासणीचे परवाने देण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.







एखादा संशयित रुग्ण एखाद्या सोसायटीत असेल तर पालिकेच्या आपत्कालीन विभागात स्वतंत्र कक्ष असेल टोलफ्री नंबरवर अशा संशयित रुग्णाची वेळीच माहिती देणे शक्य होईल. त्यामुळे सोसायटीत होणारे वाद टळतील. दूध व वर्तमानपत्र घरोघरी वितरण करणार्यांना स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने तपासणी करून घ्यायची झाल्यास तशी यंत्रणा उपलब्ध होऊ शकेल का, याबाबतही विचार करण्यात यावा. ज्या गृहनिर्माण सोसायट्या नियमित मालमत्ता कर भरतात अशांना हा कर भरणा करण्याची मुदत मार्चअखेर ऐवजी मेअखेर केल्यास नागरिकांची होणारी गैरसोय टळू शकेल, अशाही सूचना शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.

Powered By Sangraha 9.0