मध्य प्रदेशमधील सरकार अल्पमतात : शिवराजसिंह चौहान

17 Mar 2020 15:36:30

shivrajsingh chouhan_1&nb
नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये ज्योरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि मध्य प्रदेशमध्ये राजकीय उलथापाल सुरु झाली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमवेत २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने राज्यातील काँग्रसचे सरकार अडचणीत सापडले आहे. तर, भाजपकडून बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली जात आहे.
 
 
 
 
"मध्य प्रदेशचे सरकार अल्पमतात आहे. या वस्तुस्थितीला काँग्रेसच्या नेत्यांनी जेवढ्या लवकर समजून घेतले, तेवढे त्यांच्यासाठी चांगले राहील." असे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपाचे नेते शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले आहे.
 
 
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करुन मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारला बहुमत चाचणीसाठी निर्देश देण्याची मागणी भाजपाने केली होती. या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारपर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने सरकारला नोटीसही पाठवली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0