पाकिस्तानात कोरोनाचा पहिला बळी ; संसर्गग्रस्ताचा आकडा वाढता

17 Mar 2020 16:56:59

corona virus pakistan_1&n




इस्लामाबाद : जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा फटका पाकिस्तानलाही बसला असून पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. हफिजाबाद प्रांतातील नागरिकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या रात्री नागरिकाला लाहोरमधील मायो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील माहितीनुसार, दाखल करण्यात आले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते. मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

पाकिस्तानमध्येही करोनाने थैमान घातले असून २४ तासांत ११५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सिंध प्रांतात मंगळवारी सकाळी पाच नव्या रुग्णांची नोंद झाली असून देशभरात एकूण १९१ जणांना करोनाची लागण झाली आहे. करोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी इम्रान खान यांचे सरकार असमर्थ ठरल्याने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. करोनाची लागण झालेले अनेक रुग्ण हे इराणमधून परतलेले आहेत. या सर्वांना पाकिस्तान-इराण सीमारेषेवर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर या सर्वांनी त्यांच्या प्रांतात पाठवण्यात आलं होते.
Powered By Sangraha 9.0