कोरोना इम्पॅक्ट ! पुण्यामध्ये हॉटेल्स दुकाने बंद

    दिनांक  17-Mar-2020 11:22:39
|

pune_1  H x W:
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वत्र पूर्वकाळजी म्हणून दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना येईपर्यंत हा बंद ठेवण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. तसेच, अत्यावश्यक गोष्टी जसे मेडिकल आणि काही जीवनावश्यक गोष्टींची दुकाने चालू राहतील अशी सोय करण्यात आली आहे.
 
 
 
मेडिकल, किराणा मालाची दुकाने वगळली तर इतर सर्व दुकाने १७, १८ अंडी १९ मार्च असे तीन दिवस बंद राहणार, असा निर्णय पुणे व्यापारी असोसिएशनतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, पुढील सूचना येईपर्यंत पुण्यातील हॉटेल्सदेखील बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.