'फक्त ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलावा अन्यथा...' : प्रवीण परदेशी

17 Mar 2020 10:55:16

bmc private company_1&nbs
मुंबई : कोरोना व्हायरसचा परिणाम मुंबई तसेच महाराहस्त्रामध्येही दिसून आले. राज्यसरकारने शाळा, महाविद्यालय, मॉल, जिम बंद केल्यानंतर खासगी कंपन्यांनाही 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय दिला होता. परंतु, कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने पूर्वकाळजी म्हणून महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी खासगी कंपन्यांना एकूण कर्मचाऱ्यांच्या फक्त ५० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये बोलवावे असे आदेश दिले आहेत. तसेच इतरांना घरुन काम करण्याची मुभा देण्याचे आदेशही दिले आहेत. यावेळी त्यांनी आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
 
याबाबत सांगताना पुढे आयुंक्तांनी सांगितले की, राज्यात करोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवा असणाऱ्यांना लागू नाही. सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाचा पालन न केल्याच्या गुन्ह्याखाली कलम १८८ अंतर्गत सहा महिन्यांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या जाऊ शकतात. मुंबईमध्ये कोरोनाचे सहा रुग्ण सापडले आहेत. यासोबतच राज्यातील करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0