लोकल ७ दिवस बंद ठेवा तर संसर्ग रोखण्यास होईल मदत : पंकजा मुंडे

17 Mar 2020 12:47:41

pankaja munde_1 &nbs
 
 
मुंबई : देशभरासह मुंबईमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यावर राज्य सरकार योग्य तो प्रयत्न करत आहे. मुंबईतील कोरोनाबाधित ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने कडक पाऊले उचलण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत . यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी 'मुंबई लोकल ७ दिवस बंद ठेवा, तर कोरोनाचा संसर्ग कमी होणाया मदत होईल.' असा सल्ला राज्य सरकारला दिला आहे.
 
 
 
 
 
“मुंबई बंदची मदत होऊ शकते का? जर नियोजनबद्ध पद्धतीने मुंबई बंद केली तर लोकं जीवनावश्यक वस्तू घरात आणून ठेवतील. जर सात दिवसांसाठी लोकल सेवा बंद ठेवल्यास लाखो लोकांना करोनाच्या संसर्गापासून रोखण्यास मदत होईल. फक्त लोकांना आवश्यक असेल त्या वस्तूंच्या विक्रीची दुकाने उघडी ठेवण्यात यावी,” अशा आशयाचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0