बीसीसीआयचे 'वर्क फ्रॉम होम'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2020
Total Views |

bcci mumbai_1  
मुंबई : भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने सध्या आणीबाणीची स्थिती आहे. सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार मजला आहे. अनेक शाळा, महाविद्यालये, दुकाने हॉटेल्स सर्व बंद करण्याच्या मार्गावर आहेत. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. अशामध्ये बीसीसीआयनेदेखील त्यांचे मुंबईतील कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत.
 
 
२९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. खबरदारीचा उपाय म्हणून भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका बीसीसीआयने रद्द केली. १५ एप्रिलपर्यंत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास बीसीसीआय इतर पर्यायांचा विचार करणार आहे. त्यामुळे बीसीसीआय बहुतांश कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम'चा फॉर्मुला वापरण्यात आला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@