वकिलांना दिलेली आश्वासने केजरीवाल सत्तेत आल्यावर विसरले : उपोषणाचा इशारा

16 Mar 2020 18:52:01


KG_1  H x W: 0

केजरीवालांच्या विरोधात दिल्लीतील वकील एकवटले

नवी दिल्ली : निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांना दिलेली मुरढ अरविंद केजरीवालांच्या अडचणीत भर टाकणारी ठरते आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी वकिलांसंबंधी कल्याणकारी योजना राबविण्याची आश्वासने दिली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने वकील नाराज आहेत. याविषयीचे अधिकृत पत्रक दिल्ली बार कौन्सिल ने काढले असून एकमताने उपोषणाचा इशारा दिला आहे.


२०१९ सालच्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वकिलांसाठी ५० कोटीचे अर्थसंकल्पीय तरतूद करण्याचे आश्वासन दिले होते मात्र सत्तेत आल्यानंतर त्यानुषंगाने कोणतेही पाउल उचलण्यात आलेले नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याकरिता समितीही गठीत करण्यात आली होती. वकिलांसाठी आयुर्विमा , मेडिक्लेम अशा योजनांचा समावेश त्यात होता. याबाबतची आश्वासने पूर्ण न केल्याने केजारीवाल यांना दिल्ली बार कौन्सिल ने पत्रक पाठवून निर्वाणीचा इशारा दिला आहे. "कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी न झाल्यास तुमच्या निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसू ", असेही पत्रकात म्हटले आहे.


'दिल्ली बार कौन्सिल' ही दिल्लीतील वकिलांची वैधानिक संघटना असून संबंधित ठराव एकमताने पारित झाल्याचे समजते.

Powered By Sangraha 9.0