दिल्ली हिंसाचारावरून भारताला सुनावणारा इराण आता मागतोय मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2020
Total Views |
narendra modi and Hassan
 



भारत सरकारला इराणचे पत्र


तेहरान : चीनमधून उद्रेक झालेल्या कोरोना या महामारीचा सर्वाधिक प्रमाणात इराणमध्ये प्रादूर्भाव झाला आहे. इराणमध्ये एकूण १३ हजार संक्रमित रुग्ण आढळले आहेत. त्यातील सातशे जणांचा मृत्यू झाला आहे. या संकटाविरोधात लढण्यासाठी इराण सरकारने कंबर कसली आहे. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे इराणला उपाय यंत्रणांसाठी अडथळा येत आहे.
 
 
 
 
इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ यांनी जगभरातील विविध नेत्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. 'इराणमध्ये कोरोनाशी लढा देण्याचा आमचा प्रयत्न सुरूच आहे. अमेरिकेने आणलेले निर्बंध आम्हाला यासाठी अडचण ठरत आहेत. विषाणूला सीमा, भूगोल काही नसतो, त्यामुळे निरपराध जीवांशी खेळ करू नये.', असे आवाहान त्यांनी जगभरात केले आहे. इराणने ५८ वर्षांत प्रथमच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कोरोना संदर्भात लढण्यासाठी मदत मागितली आहे. १९६२ मध्ये या प्रकारची मदत इराणने मागितली होती. इराणचे सेंट्रल बॅंकेचे प्रमुख अब्दोलनसर हेम्मती यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाच अब्ज डॉलर्स (३६ हजार कोटी रुपये) आपत्कालीन कर्ज मागितले आहे.
 
 
 
 
भारताकडेही इराणने मदत मागितली आहे. अमेरिकेचे निर्बंध शिथील व्हावेत यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, अशी मागणी इराणने केली आहे. भारत-इराण यांचे परस्पर व्यापारी संबंध गेल्या कित्येक वर्षांपासून दृढ आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयावर इराण गेल्या काही काळापासून टीका करत आला आहे. कलम ३७०, सीएए, दिल्ली हिंसाचार आदी निर्णयांविरोधात इराणने उघड नाराजी व्यक्त केली होती.





@@AUTHORINFO_V1@@