ब्रेकिंग : का केली गांगुलीने संजय मांजरेकरांची हकालपट्टी?

    दिनांक  14-Mar-2020 15:24:43
|

sanjay manjrekar_1 &
 
 
नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण क्रीडाविश्व हैराण आहे. अशामध्ये अनेक क्रिकेट मालिका बीसीसीआयने रद्द केल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने क्रिकेट विश्वाला जबरदस्त फटका बसला आहे. अशामध्ये बीसीसीआयने आणखी एक निर्णय घेतला जो क्रिकेट पाहणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तम समालोचक संजय मांजरेकर यांनी समालोचकाच्या यादीमधून वगळण्यात आले आहे.
 
 
 
अनेक बाबी लक्षात घेऊन साऊराव गांगुलीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकृतरीत्या याबाबतीत काही घोषणा झाली नसली तरी क्रीडा प्रेमींसाठी हा खूप मोठा धक्का आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी १९९६मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर मांजरेकरांनी समालोचक म्हणून स्वतःची नवी इनिंग सुरु केली. त्यांनी आतापर्यंत ३ विश्वचषकामध्ये समालोचन केले आहे. मात्र बीसीसीआयने त्यांचा आयपीएलच्या पॅनलमध्ये तसेच इतर पुढच्या काही पॅनलमध्येही समावेश केलेला नाही.
 
 
 
 
नक्की का वगळले ?
 
 
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, धर्मशाळा येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील सामन्यादरम्यान पॅनलमध्ये समावेश असूनही उपस्थित नव्हते. या गैरवर्तवणुकीमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील पहिला एकदिवसीय सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर कोरोना व्हायरसच्या फटक्यांमुळे संपूर्ण मालिकाच रद्द करण्यात आली.
 
 
मांजरेकरांची व्यक्तव्ये आणि वाद
 
 
संजय मांजरेकर यांनी मैदानामध्ये आपल्या खुमासदार शैलीमध्ये समालोचन केले. परंतु, मैदानाबाहेर त्यांच्या बेजबाबदार व्यक्तव्यांमुळे मात्र ते नेहमीच चर्चेत राहिले. संजय मांजरेकर आणि रवींद्र जडेजा यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. संजय मांजरेकर यांनी याआधी रविंद्र जडेजा हा चांगला खेळाडू नसल्याचे मत व्यक्त केले होते. यावरून क्रिकेट चाहत्यांनी त्यांना चांगले फैलावर घेतले होते. तसेच, त्यांनी समालोचक आणि क्रिकेट विश्लेषक हर्षा भोगले यांचाही अपमान केला होता.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.