केंद्राचा दिलासा : मास्क आणि सॅनिटायझर आता अत्यावश्यक वस्तू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2020
Total Views |

mask_1  H x W:



उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद


नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी): देशभरात मास्क आणि हँड सॅनिटायझरच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी चढ्या दराने त्यांची विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्याची दखल घेत केंद्र सरकारने एन ९५ मास्क, सर्जिकल मास्क आणि हँड सॅनिटायझरला आवश्यक वस्तू श्रेणीमध्ये समाविष्ट केले आहे. यामुळे चढ्या दराने विक्री, साठेबाजी आणि काळाबाजार रोखणे शक्य होणार आहे. सदर आदेश ३० जूनपर्यंत कायम राहणार असून त्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
@@AUTHORINFO_V1@@