मॉर्फ फोटोप्रकरणी निलेश साबळेंकडून जाहीर माफी

14 Mar 2020 14:55:03
hava yeu dya_1  



मॉर्फ फोटोवरून संभाजीराजे आक्रमक; निलेश साबळेंना दिलेला इशारा


मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा चूकीच्या पद्धतीने वापर केल्याबद्दल कार्यक्रमाचे सुत्रसंचालक निलेश साबळे यांनी जाहीर माफी मागीतली आहे.


छत्रपती शाहूंचा अपमान झाल्यानंतर वादावर स्पष्टीकरण देत निलेशनी जाहीर माफी मागितली आहे. निलेश साबळेचा एक व्हिडिओ ‘झी मराठी’च्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 'कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या स्किटमध्ये फोटो हा वेगळ्या अर्थाने दाखवण्यात आला होता. स्किटमध्ये वापरण्यात आलेला फोटो शाहू महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टीमधून ही चूक झाली असून…घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही क्षमस्व असल्याचे निलेश साबळेंनी या व्हिडिओत म्हटले आहे.





'चला हवा येऊ द्या'मधील एका भागात कलाकार छत्रपती शाहू महाराजांच्या वेषात दाखविले होते. त्यामुळे त्यावर शाहूप्रेमींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हा शाहू महाराजांचा अवमान असून या शोच्या कलाकारांनी माफी मागावी, अशी मागणी होत होती. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनीही या प्रकारावर ट्विटरद्वारे तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या होत्या. निलेश साबळे तसेच झी वाहिनीने या गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी व दिग्दर्शकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
Powered By Sangraha 9.0