गोव्यात क्रूझ बोट, डिस्को क्लब आणि कॅसिनो बंद : मुख्यमंत्री

14 Mar 2020 17:20:29

corona goa_1  H
पणजी : कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे देशभरामध्ये सतर्कता बाळगण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. कोरोनाचा फटका गोव्यातील पर्यटन व्यवसायालाही बसला आहे. ३१ मार्चपर्यंत गोव्यात क्रूझ बोट, डिस्को क्लब, कॅसिनो, सर्व शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी माहिती दिली.
 
 
 
दहावी, बारावीच्या परीक्षा मात्र, ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे. तसेच राज्यातील मॉल, रेस्टॉरंट आणि हॉलेट सुरू राहणार असल्याचे माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अनेक राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मॉल, सिनेमागृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरामध्ये कोरोनाचे ८० पेक्षा जास्त नागरिक आढळून आले आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नियमावली जारी केली आहे. दिल्लीमध्ये कोरोना विषाणूमुळे एका ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. भारतातील हा कोरोनाचा दुसरा बळी आहे. कोरोनाचा पहिला बळी कर्नाटक राज्यात गेला आहे. महाराष्ट्रामध्येही १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0