मुंबई, पुण्यातील नाट्यगृहे व सिनेमागृहे आज मध्यरात्रीपासून बंद

13 Mar 2020 17:41:14


corona _1  H x



मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील व्यायामशाळा, मॉल्स, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद राहणार असल्याची माहिती आज पत्रकारपरिषदेत दिली. राज्यातील कोरोना रुग्णांची व संशयितांची संख्या वाढत असल्याने करोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी लोकांनी अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळली पाहिजे असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. पुणे आणि पिंपरीमधील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. करोनाबाबत घेतलेले निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू केले जाणार आहेत. परीक्षा उशिरा घेण्यासंबंधी विचार केला जात आहे असेही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळावर व्यवस्था करण्यात आली आहे.



'खाजगी क्षेत्रातील मालक व संस्था चालकांना शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना 'work from home'ची परवानगी द्यावी. हॉटेल्स, बस व रेल्वेसेवा यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरु असली तरी आवश्यकता असल्याशिवाय प्रवास करणे टाळावे,असेही ते म्हणले  सुदैवाने अजून १७ ही लोकांमध्ये गंभीर लक्षणे दिसत नाही आहेत. आपण दक्षता घेतली तर पुढील धोका टाळू शकतो असे यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील व्यायामशाळा, मॉल्स, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद ठेवण्यात येणार असून मध्यरात्रीपासून या आदेशाची अमलबजावणी होणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. 
Powered By Sangraha 9.0