गुगलचे भारतातील ऑफिस बंद!

13 Mar 2020 13:48:34
google office_1 &nbs





कोरोनाची धास्ती; गुगलने कर्मचाऱ्यांना दिले आदेश 

बंगळुरु : कोरोना व्हायरसने जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. कोरोनाचे ७० पेक्षा जास्त रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. त्यामुळे अनेक राज्यांनी शाळा महाविद्यालयासह थिएटरही बंद ठेवली आहे. पण आता बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही कोरोनाचा फटका बसायला लागला आहे. कोरोनाची बंगळुरुमधील गुगल कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लागण झाल्यानंतर कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.


आमच्या बंगळुरु कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा कर्मचारी कोरोनाची लक्षण दिसण्याआधी काही तास कार्यालयामध्ये होता. त्याला आता अलिप्त ठेवण्यात आल्याची माहिती गुगलने दिली. आम्ही कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या प्रसारामुळे घरूनच काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचे सांगितले आहे. आरोग्य विभागाच्या आदेशानुसार आम्ही योग्य ती काळजी घेत राहू, असेही गुगलने स्पष्ट केले आहे.
Powered By Sangraha 9.0