येस बँकच्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी

13 Mar 2020 16:37:43
yes bank_1  H x




एसबीआय करणार ४९ टक्के गुंतवणूक

नवी दिल्ली : संकटात सापडलेल्या येस बँकेला अखेर सरकारचा आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सरकारपुढे मांडला होता. त्यालाच शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनर्बांधणीच्या प्लॅनमध्ये येस बँक आणि सरकारला एसबीआयकडून मदत मिळणार आहे. त्यासोबतच, इतर गुंतवणूकदारांचा सध्या शोध घेतला जात आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारमण शुक्रवारी म्हणाल्या, "आरबीआयने येस बँकेच्या बुनरबांधणी प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेतील ४९ टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक करणार आहे. उर्वरीत इक्विटीसाठी गुंतवणूकदारांचा सध्या शोध घेतला जात आहे. एसबीआयकडून गुंतवणूक केल्या जाणाऱ्या इक्विटीपैकी २६% इक्विटी ३ वर्षांसाठी लॉक केल्या जाणार आहेत. इतर गुंतवणूकदारांना ७५% इक्विटी अशाच पद्धतीने लॉक कराव्या लागणार आहेत." नवीन प्लॅनसाठी येत्या ७ दिवसांत मंडळ तयार केले जाईल असेही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0