अर्थसंकल्पावर अजित पवारांनी दिलेली उत्तर दिशाभूल करणारी : विरोधीपक्षनेते

13 Mar 2020 14:16:55

devendra fadnavis_1 



मुंबई
: अर्थसंकल्पावर उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार यांनी केवळ भाषणबाजी केली आहे. अर्थसंकल्पावर त्यांची उत्तर दिशाभूल करणारी होती. राज्यावरील कर्ज, राजकोषीय तूट, महसुली तुटीबाबत कुठलाही उल्लेख यामध्ये करण्यात आला नाही. आजवरचा हा पहिला असा अर्थसंकल्प असेल ज्यामध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सचा उल्लेख नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका केली.विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.



राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून करोना आजाराच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन आटोपते घेण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी सभागृहात अर्थसंकल्पावरील उत्तरादरम्यान अर्थमंत्र्यांनी दिशाभूल करणारी उत्तरे दिल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना, बेरोजगारांना काहीही मिळालेले नाही. अनेक जिल्ह्यांतील योजना कमी करण्यात आल्या आहेत. मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय करणारा हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील योजनांसाठी कमी पैसा देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या योजनांचाही निधी कापण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमधील निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे,असा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.आमच्या सरकारच्या काळात सुरु झालेल्या या योजनेसाठी सरकारने एक नवा पैसाही दिलेला नाही. याबाबत आम्ही मुद्दा उपस्थितत केला मात्र त्याचे उत्तर अर्थमंत्र्यांनी दिले नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
Powered By Sangraha 9.0