क्रीडा विश्वाला कोरोनाचा जबरदस्त फटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2020
Total Views |

road safety comp_1 &
 
मुंबई : जगभरामध्ये कोरोनाचा झटका आता संपूर्ण क्रीडाविश्वाला बसला आहे. मोठमोठ्या स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, महाराष्ट्रामध्येही खेळवण्यात येणारे रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचे सामन्यांमध्ये आता प्रेक्षकांना प्रत्यक्षदर्शी पाहता येणार नाही. त्यामुळे आता जवळजवळ करोडोंचा फटका या स्पर्धेला बसणार हे निश्चित. तसेच पुढे २९ मार्चला येऊन ठेपलेल्या आयपीएल २०२०च्या सामान्यांबाबतही साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या उर्वरित लढती नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. पण, प्रेक्षकांना प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन त्याचा आस्वाद घेता येणार नाही. आयोजकांनी गुरुवारी तसे निवेदन जाहीर केले आहे. त्याशिवाय या स्पर्धेचा दुसरा टप्पा १४ ते २० मार्चला पुण्यात होणार होता. पण, आता ते सर्व सामने डी वाय पाटील स्टेडियमवर होतील. २२ मार्चला स्पर्धेचा अंतिम सामनाही येथेच होणार आहे. तसेच ऑनलाईन तिकीट खरेदी केलेल्यांना ७ ते १० दिवसांमध्ये पैसे रिफंड करणार असल्याचे देखील सांगितले.
 
 
 
तसेच, अमेरिकेतील जगप्रसिद्ध एनबीए बास्केटबॉल स्पर्धाच रद्द करण्यात आली आहे. एका खेळाडूलाच कोरोनाची लागण झाल्याने एनबीएने हा निर्णय घेतला. त्याचसोबत ऑलिम्पिकवरही कोरोनाचे काळे ढग निर्माण झाले आहेत. त्यामुळे जगभरामध्ये अनेक देशांना करोडोंमध्ये तोटा होत आहे. तसेच, भारतातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आयपीएल २०२०वर अद्यापही तोडगा निघत नाही आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये खूप मोठा निरुत्साह दिसून येत आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@