जगभरात पसरलेला कोरोना 'साथीचा रोग' घोषित

12 Mar 2020 12:41:09

corona _1  H x



जिनिव्हा :
जगभरात कोरोना वेगात पसरत आहे. आत्तापर्यंत जवळपास १०७ पेक्षा अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) कोरोना विषाणू हा 'साथीचा रोग' असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



भारतातही कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. केरळ, हरियाणा, उत्तरप्रदेश, पंजाबनंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६३ हून अधिक झाली आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता देशाचे आरोग्य मंत्रालय विशेष खबरदारी घेत आहे. याचाच एक भाग म्हणून, मंत्रालयाने १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हिसा रद्द केले आहेत.






चीनच्या वुहान शहरात २३ जानेवारीपासून 'लॉकडाउन' लागू करण्यात आले आहे. चीनमध्ये 'करोना' संसर्गामुळे सुमारे ३१०० लोकांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश मृत्यू वुहान शहरासह हुबेई प्रांतात झाले आहेत.चीनच्या वुहान राज्यातून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत ४ हजारापेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला आहे. यामध्ये चीन, इटली, इरान, दक्षिण कोरिया, स्पेन, फ्रान्स, अमेरिका, जपान, इराक, इंग्लंड, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, लेबनॉन, स्वित्झर्लँड, मरीनो, जर्मनी, बेल्जीयम, इंडोनेशिया, पनामा, मोराक्को, कॅनडा, फिलीपाईन्स, इजिप्त, अर्जेंटीना, थायलँड आणि तैवान यांसारख्या देशातील नागरिकांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0