जगातील एकमेव दुर्मीळ पांढऱ्या जिराफांची शिकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2020
Total Views |

giraffe _1  H x

 

 

केनियामधील गॅरिसा प्रातांमधील घटना

 
मुंबई (प्रतिनिधी) - जगात एकमेव असणाऱ्या दोन पांढऱ्या जिराफांचा शिकाऱ्यांनी जीव घेतला आहे. यामध्ये एक मादी आणि तिच्या पिल्लाचा समावेश आहे. केनियामधील गॅरिला प्रातांतील इशाकबिनी हिरोली कम्युनिटी काॅन्झर्व्हरेन्सीमध्ये ही घटना घडली असून आता याठिकाणी शेवटचा पांढरा नर जिराफ शिल्लक राहिला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
गॅरिसा प्रातांमध्ये २०१७ साली सर्वप्रथम दोन दुर्मीळ पांढरे जिराफ (मादी आणि नर) आढळून आले होते. या जिराफांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याासाठी त्यांना गॅरिसा प्रातांमधील इजारा समुदाय संवर्धन क्षेत्रामध्ये ठेवण्यात आले. या दोन जिराफांचे मिलन होऊन गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात त्यांना पिल्लू झाले. मात्र, गेल्या आठवड्यात शिकाऱ्यांनी पांढऱ्या जिराफामधील मादी आणि तिच्या पिल्लाची शिकार केली. इजारा समुदाय संवर्धन क्षेत्राचे व्यवस्थापक मोहम्मद अहमदनूर यांनी सांगितले की, बराच शोध घेतल्यावर मंगळवारी या दुर्मिळ जिराफांचे केवळ सांगाडे सापडले. संपूर्ण इजारा आणि केनियाच्या समुदायासाठी हा अत्यंत दु: खाचा दिवस असून दुर्मीळ प्रजातींच्या संवर्धनासाठी समुदायाने घेतलेल्या प्रयत्नांना ही घटना मोठा धक्का असल्याचे ते म्हणाले. या घटनेमुळे संवर्धनाच्या प्रयत्नांना निरंतर पाठिंबा द्यावा लागेल, असे अहमदनूर यांनी निवेदनात म्हटले आहे.
 
 
 
जगामध्ये अशा प्रकारचे एकमेव पांढरे जिराफ आढळल्याने स्थानिक समुदाय आणि वन्यजीव संशोधकांमध्ये उत्साह निर्माण केला होता. शिवाय या जिराफांमुळे गॅरिसा प्रातांतील पर्यटनालाही चालना मिळाली होती. संधोकांच्या मते, या जिराफांमधील ल्युझिझम नावाच्या अनुवांशिक अवस्थेमुळे त्वचेच्या पेशींनी रंगद्रव्य निर्माण होण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे ही जिराफे पांढऱ्या रंगाची झाली. मात्र, आता या जिराफांच्या मृत्यूमुळे यासंबंधी अनुवांशिक अभ्यास करणाचे प्रयत्न फोल झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@