'काँग्रेसपक्ष आता पूर्वीसारखा राहिला नाही' : ज्योतिरादित्य शिंदे

11 Mar 2020 15:32:10

jyotiraditya_1  
 
 




नवी दिल्ली : मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का देत कमलनाथ सरकारमध्ये राजकीय भूकंप घडवून आणणारे ज्योतिरादित्य सिंधिया यांचा भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश झाला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला.भाजप मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमवेत मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते.दरम्यान, ते गुरूवारी भोपाळला जाणार असून १३ मार्च रोजी ते राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत.



यावेळी बोलताना ते म्हणाले," माझ्या आयुष्यात असे दोन दिवस होते ज्याने माझे आयुष्य बदलले. पहिला ३० सप्टेंबर २००१, ज्या दिवशी मी माझे वडील गमावले. दुसरी तारीख १० मार्च २०२०होती ज्या दिवशी मी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. जी त्यांची ७५ वा जयंती दिवस होता.ते म्हणाले की, आमचा उद्देश केवळ सार्वजनिक सेवा असावी असा माझा विश्वास आहे. मी आणि माझे वडील नेहमी त्यावर काम करत होतो. सिंधिया यांनी कॉंग्रेसवर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, "आता कॉंग्रेस पूर्वीची कॉंग्रेस नाही. मी माझ्या राज्यासाठी स्वप्न पाहिले होते ,परंतु ते १८ महिन्यांतही ते पूर्ण झाले नाही मध्यप्रदेश सरकारने कर्जमाफी आणि रोजगाराच्या मुद्द्यावर दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. राज्यात वारंवार अधिकाऱ्यांच्या बदल्या व भ्रष्टाचार फोफावला आहे. ते म्हणाले की माझे मन खूप व्यथित आहे. कॉंग्रेस हा आता तो पक्ष राहिला नाही जो स्थापना झाली तेव्हा होता." पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक करत भाजप परिवारात शामिल केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना शिंदे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो जनादेश मिळाला आहे, तो यापूर्वी इतिहासातही कोणाला मिळाला नसेल."



तत्पूर्वी, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकारांना सांगितले की, “आज आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे आणि आज मी ज्येष्ठ नेत्या दिवंगत राजमाता शिंदे यांचे स्मरण करीत आहे. भारतीय जनता संघ आणि भाजप या दोन्ही पक्षांचा पक्ष स्थापनेपासूनच या विचारसरणीत त्यांचा मोठा वाटा आहे. ते म्हणाले, 'ज्योतिरादित्य आज आपल्या कुटूंबात सामील होत आहेत, मी त्यांचे मनापासून स्वागत करतो."





Powered By Sangraha 9.0