कोरोनाचे सावट भारत द.आफ्रिकेच्या मालिकेवरही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2020
Total Views |

INDvSA_1  H x W
 
 
नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान ३ एकदिवसीय सामन्याची मालिका भारतामध्ये होणार आहे. पहिला सामना धर्मशाळा, दुसरा सामना लखनौ तर तिसरा सामना कोलकत्ताच्या ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी तसेच खेळाडू राहत असलेल्या हॉटेल्समध्ये कोरोना संबंधी विशेष काळजी घेण्यात येत आहे.
 
 
 
१२ मार्च पासून सुरु होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू सज्ज झाले आहेत. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेने मैदानाबाहेर एक मोठा फलक लावला आहे. या फलकावर करोना होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी कोरोना विषाणूंमुळे आफ्रिकेच्या खेळाडूंनी भारतीय संघाच्या खेळाडूंना हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय त्यांच्या वैद्यकीय टीमने खेळाडूंना सुरक्षेच्या कारणास्तव अनेक सूचनाही केल्या आहेत. भारतीय संघाच्या खेळाडूंनीही कोरोनाची धास्ती घेतली आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे ६० संशयीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आयपीएलच्या १३व्या पर्वावर संकट निर्माण झाले आहे. २९ मार्चपासून आयपीएलच्या १३व्या पर्वाला सुरुवात होणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@