कोरोना बचावासाठी मास्क आणि हँण्डवॉश रेशन दुकानातून उपलब्ध करुन द्यावा : चंद्रकांतदादा पाटील

11 Mar 2020 17:54:17

chandrakantdada patil_1&n
 
 
मुंबई : कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, याच्यापासून बचावासाठी सर्वसामान्य नागरिकांना मास्क आणि हँण्ड वॉश हे रेशन दुकानातून अत्यल्प दरात उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केली. कोरोना विषयावर औचित्याचा मुद्द्याद्वार बुधवारी विधानसभेवर चंद्रकांतदादा पाटील बोलत होते.
 
 
 
ते पुढे म्हणाले की, "पुण्यात कोरोना रोगाचे पाच संशयित रुग्ण आढळले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. याच्या बचावासाठी औषध विक्री दुकानातून तोंडाला लावण्यासाठीचे मास्क अव्वाच्या सव्वा दराने विकले जात आहेत. यामुळे सर्वसामान्य आणि झोपडपट्टी भागातील नागरिकांना हे परवडण्याजोगे नाही. त्यामुळे शासनाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी मास्क आणि हँड वॉश हे रेशन दुकानातून अत्यल्प दरात उपलब्ध करुन द्यावेत," असे ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0