सुशांतचा ‘Reसंस्कृत’ प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |sushant ratnaparkhi_1&nbs


संस्कृत भाषेची डिजिटल मीडियाशी सांगड घालत या भाषेचा प्रसार करणाऱ्या व भाषा संवर्धनाचा वसा घेतलेल्या मुंबईतील सुशांत रत्नपारखीविषयी


आज आपण आधुनिकीकरणाच्या एका अशा टप्प्यावर आहोत जेथे संस्कृत ही प्राचीन भाषा आता बोलीभाषेतून लुप्त झाली आहे. एक प्राचीन काळ असा होता जेव्हा विश्वनिर्मितीचा इतिहास या भाषेत लिहिला गेला. हिंदू संस्कृतीचे महत्त्व विशद करणारे वेदादी ग्रंथ याच भाषेतील आहेत. परंतु, काळानुरूप पाश्चिमात्त्य संस्कृतीची भारतीय संस्कृतीत सरमिसळ होऊन लोकांमध्ये पाश्चिमात्त्य संस्कृतीची लोकप्रियता वाढत गेली व आपल्या भाषा, संस्कृती याचा विसर आजच्या तरुणाईला पडत चालला आहे, याची खंत जाणवू लागली. परंतु, यातही भारतीय संस्कृती, आपल्या मूळ भाषा व त्याचा गाभा जपणारी बोटावर मोजण्याइतकी लोक समाजात आजही आहेत, जी आपले काम चोख पार पाडत आहेत. अशाच एका तरुणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मुंबईतील सुशांत रत्नपारखी हा तरुण संस्कृत भाषेची डिजिटल मीडियाशी सांगड घालत या भाषेची एक नवीन ओळख लोकांसमोर मांडत आहे. जेणेकरून लोकांमध्ये संस्कृत भाषेविषयी आत्मीयता निर्माण होऊन त्यांना त्यात रस निर्माण होईल. सुशांत रत्नपारखीने ‘REसंस्कृत’(Resanskrit) नावाचे एक संकेतस्थळ आणि इन्स्टाग्राम पेज सुरू केले आहे. जिथे तो नव्या आणि अनोख्या पद्धतीने संस्कृत भाषा सादर करतो. यामध्ये संस्कृत श्लोक, त्याचे हिंदी व इंग्लिश भाषांतरण करून त्यात आकर्षक व्हिज्युअल्स एकत्रित करत काही मजकूर तो सादर करतो.सुशांत मूळचा औरंगाबादमधील आहे
. त्याचे संपूर्ण शिक्षण औरंगाबादमध्येच झाले. पुढे नोकरीच्या निमित्ताने मागील काही वर्षांपासून तो मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. त्याला भारतीय संस्कृती, मूल्ये आणि त्यांची जपवणूक करणे यात अधिक रस असल्याने तो कायम यासाठी प्रयत्नशील असतो. त्यातूनच ‘REसंस्कृत’ या उपक्रमाचा जन्म झाला. सुशांत त्याच्या उपक्रमाबद्दल म्हणतो, “गेल्या १५ वर्षात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने देशात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, म्हणून मला वाटलं की संस्कृतलाही एक नवीन स्थान प्राप्त होऊ शकेल. मी त्या दिवसाची खूप वाट पहिली, पण तसे काहीही झाले नाही. मग मला वाटले मीच ही सुरुवात का करत नाही?” सुशांतला आधीपासूनच डिझाईन आणि डिजिटल मार्केटिंगचा अनुभव होता. त्यामुळे या अनुभवासह त्याने २०१६मध्ये इन्स्टाग्रामवर ‘REसंस्कृत’(Resanskrit) नावाचे एक पेज सुरू केले. त्याने या पेजवर आकर्षक व्हिज्युअल्समवेत काही संस्कृत श्लोक सादर केले. सुशांतच्या पेजला पहिल्याच आठवड्यात २ हजारांहून अधिक ‘फॉलोअर्स’ मिळाले.सुशांत म्हणतो
, “हा प्रतिसाद पाहून माझ्या एक गोष्ट लक्षात आली, लोक कित्येक दिवसांपासून याच्या प्रतीक्षेत होते. लोकांना माझा मजकूर आवडतोय. या मजकुरात खूप क्षमता आहे. मी हे काम असेच चालू ठेवले. या पानावरील सर्व मजकूर कोणत्याही प्रमोशनशिवाय लोकांपर्यंत पोहोचला. आज ‘RE संस्कृत’च्या इन्स्टाग्राम पानावर १ लाख, ७० हजारांपेक्षा अधिक ‘फॉलोअर्स’ आहेत. लोकांना त्यातील श्लोक, त्याचा अर्थ याची मांडणी आवडते आहे आणि त्यांच्या येणार्‍या प्रतिक्रिया मला अधिक काम करण्यास प्रोत्साहन देतात.” २०१८मध्ये सुशांतने ‘RE संस्कृत’ला मुख्य प्रवाहात आणायचे ठरवले. यावेळेत त्याने एक संकेतस्थळदेखील बनवले. या संकेतस्थळावर त्याने संस्कृत भाषेवर विस्तारित लेख लिहिले आहेत. वाचक या लेखनालाही विशेष पसंती देतात. ‘REसंस्कृत’ या संकेतस्थळाला दरमहा एक लाखांहून अधिक लोक ‘व्हिजिट’ करतात. हा प्रतिसाद बघता त्याने रोजच्या वापरात येतील अशा वस्तूंवर संस्कृत भाषेतील श्लोक येतील अशा पद्धतीने काही टी-शर्ट, फोन कव्हर आणि वॉल आर्ट्स यावर संस्कृत श्लोक छापले व त्याची विक्रीदेखील संकेतस्थळावरून सुरू केली. सुरुवातील केवळ डिजिटल माध्यमातून सुरू केलेले कार्य पुढे तरुणाईच्या आवडीनुसार बदलत त्याने पुढे वाढविले.

 manasa_1  H x W


सुशांत सध्या एका कंपनीत डिजिटल मार्केटिंग व्यवस्थापक म्हणून पूर्णवेळ कार्यरत आहे आणि याबरोबर तो वेळ देऊन संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. सुशांतची येत्या काळात हे कार्य पूर्णवेळ नोकरी म्हणून स्वीकारण्याची तयारीदेखील आहे. तो सांगतो की, “हजारो लोक पेजच्या माध्यमातून संपर्क साधतात. त्यांची एकच भावना असते की, हा उपक्रम खूप महत्त्वाचा होता. बरेच लोक याची वाट पाहत होते. ‘पाश्चात्त्य सभ्यता’ काही प्रमाणात आपल्यावर अधिराज्य गाजवते, ज्यामुळे लोक त्यांच्या संस्कृतीतून कुठेतरी दूर जात होते. परंतु, ‘REसंस्कृत’मधून ही आपली संस्कृती आधुनिक स्वरुपात त्यांच्यासमोर आली, जी लोकांना खूप पसंत पडली आहे.”

 manasa_1  H x W
‘REसंस्कृत’
या उपक्रमामुळे अनेक संस्कृततज्ज्ञ आणि मुक्तलेखक सुशांतशी जोडले गेले आहेत. त्याचे वडील आणि बहीण ई-कॉमर्समध्ये त्याला मदत करतात. सुशांतचे सर्व व्यवहार मुख्यत: औरंगाबादहून चालवले जातात. यंदाच्या वर्षामध्ये सुशांतने आपल्या संकेतस्थळावरून ५ हजार ५०० हून अधिक ऑर्डर्स पूर्ण केल्या आहेत. याबरोबरच ‘दि सोल्ड स्टोअर’च्या प्लॅटफॉर्मवर चार हजारांहून अधिक ऑर्डर्स पूर्ण केल्या आहेत. सुशांतचा असा विश्वास आहे की, तो अद्याप मोठ्या वाचकांपर्यंत आणि ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नाही. सुशांत आता अधिक डिझाईन्स आणि उत्पादनांवर, नवनवीन कल्पनांवर काम करत आहे. सुशांतचा असा विश्वास आहे की, ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल, तसेच संस्कृतची पाळेमुळे खोलवर रुजून ही मूल्ये डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार होईल. अशा आधुनिक माध्यमांशी सांगड घालत भाषा संवर्धनाचा वसा घेतलेल्या सुशांत रत्नपारखीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा !

 

@@AUTHORINFO_V1@@