अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर

08 Feb 2020 10:56:54


donald trump _1 &nbs



नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारत दौर्‍याची तयारी जोरात सुरू आहे. ट्रम्प या दौऱ्यात अधिक वेळ राजधानी नवी दिल्लीत घालवतील, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. याचबरोबर पर्याय म्हणून ते ताजमहालला भेट देण्यासाठी आग्रा येथेही जाऊ शकतात. या व्यतिरिक्त ते अहमदाबादमध्ये 'हाऊडी मोदी'सारख्या एखाद्या कार्यक्रमास संबोधित देखील करू शकतात.



डोनाल्ड ट्रम्प यांचा २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान दोन दिवसांचा भारत दौरा निश्चित होण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील सुरू असलेला व्यापारातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांचा असा दावा आहे की
, यावेळी दोन्ही देशांमध्ये व्यापार करार झाला आहे. भारत आणि अमेरिकेच्या व्यापारविषयक बाबींशी संबंधित अधिकारी सध्या प्रस्तावित कराराला अंतिम रूप देत आहेत. या करारात काही व्यावसायिक क्षेत्रांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात, ट्रम्प यांच्या वॉशिंग्टनच्या विदेश दौर्‍या हाताळणार्‍या उच्चस्तरीय संघाने भारत दौरा केला आणि राष्ट्राध्यक्षांच्या पहिल्या भारतीय भेटीच्या तयारीची चाचणी घेतली.



हाऊ डी मोदी
' सारख्या कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली जात आहे

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याच्या वेळी ह्युस्टनमध्ये 'हाऊ डी मोदी' हा कार्यक्रम झाला होता. अमेरिकेत होणाऱ्या यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत मुळचे गुजराथी रहिवाश्यांची संख्या लक्षात घेता डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली जात असल्याची चर्चा आहे. अहमदाबादमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी तयारी सुरु आहे. गुजराती वंशाचे अमेरिकनसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. 

Powered By Sangraha 9.0