गोल्डन टेंपलच्या बाहेर नमाजपठण ; संबित पात्रांचा आक्षेप

08 Feb 2020 15:41:45

sambit patra_1  
नवी दिल्ली : देशभर सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यासाठी पंजाबच्या स्वर्ण मंदिराबाहेर मुस्लिम समुदायाने नमाज पठण केले. हिंदू, मुस्लिम, शिख आणि ख्रिस्तींसह सर्वच एक आहेत हे सांगणे यामागचा हेतू होता. परंतु, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते असलेले संबित पात्रा यांनी नमाज पठणावर तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांनी यासंदर्भातील फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. तसेच मुस्लिमांनी गुरुद्वारा परिसरात नमाज पठण करणे हे एकतर्फी आहे का? असा सवाल केला आहे.
 
 
 
 
गुरुद्वाराबाहेर नमाज केली, मशीदीबाहेर यज्ञ करू शकतो का?
 
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये संबित पात्रा यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पण, त्याआधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांनी गुरुद्वाराबाहेर नमाज पठणावर आक्षेप नोंदवला. गुरुद्वारा परिसरात मुस्लिम समुदाय नमाज पठण करतानाचे फोटो शेअर करून संबित पात्रा यांनी लिहिले आहे की, "अशाच प्रकारे मशीदीबाहेर सुद्धा यज्ञ किंवा कीर्तन केले जाऊ शकते का? की हे केवळ एकतर्फी आहे? खरोखर सामाजिक बांधिलकी दाखवण्यासाठी आम्हालाही परवानगी मिळेल का?" या सर्व पराकारानंतर बहुतांश लोकांनी संबित पात्रा यांच्या ट्विटचे समर्थन केले.
Powered By Sangraha 9.0