मनसे मोर्चाला पुणे पोलिसांचा नकार ; मुंबईच्या मोर्चाकडे लक्ष

08 Feb 2020 12:39:57

MNS pune_1  H x
पुणे : रविवारी, ९ तारखेला बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश घुसखोरांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता मुंबईसह पुण्यामध्येही बाईक रॅली निघणार होती. परंतु, पुणे पोलिसांनी पुण्यामध्ये मोर्चाची परवानगी नाकारली. अखेर पुण्यातील मनसे सैनिकांनी हा कार्यक्रम रद्द करून पुण्यातील मनसे सैनिकांना मुंबईतील सभेमध्ये शामिल होण्यास सांगितले आहे.
पुणे पोलिसांना वाहतुकीवर परिणाम होईल सांगत बाईक रॅलीला परवानगी देण्यास नकार दिला. तसेच या रॅलीमुळे नागरिकांना त्रास होईल असेही सांगण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून या रॅलीला सुरुवात होणार होती. मनसे कार्यकर्त्यांनी मात्र मुस्लिमबहुल भागातून रॅली जात असल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांना परवानगी नाकारल्यानंतरही मनसे कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पोलिसांनी कारवाई करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. नारायण पेठ पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ही रॅली पार पडणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान रविवारी दुपारी १२ वाजता मनसेच्या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. दुपारी बारा वाजता मोर्चा सुरु होईल. गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0