दिल्ली विधानसभा निवडणूक : आप - काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

08 Feb 2020 13:22:57
 
alka lamba delhi_1 &
 
 
 
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडत आहे. यादरम्यान मजनू का टीला येथील मतदान केंद्रावर आप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी काँग्रेसच्या उमेदवार अल्का लांबा यांनी आप कार्यकर्त्याला चापट मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकाराबद्दल पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी सांगितले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटवण्यात आला.


दिल्लीत मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार अल्का लांबा आढावा घेण्यासाठी मजनू का टीला येथील मतदान केंद्रावर आल्या होत्या. यावेळी तेथे उपस्थित एका आपच्या कार्यकर्त्याने अल्का यांच्याविषयी अभद्र टिप्पणी केली. या टिप्पणीवर भडकलेल्या अल्का यांनी संबंधित कार्यकर्त्याला चापट मारण्याचा प्रयत्न केला. लांबा यांनी पोलिसांना आप समर्थकाविरूद्ध एफआयआर दाखल करण्यास सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0