भाजप सरकारचे काम मस्त; महाविकासआघाडीचे सुस्त

07 Feb 2020 20:30:41


maharashtra government _1



मुंबई
: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात आल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, कामकाजाच्या तुलनेत राज्यातील हे महाविकास आघाडीचे सरकार आधीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारपेक्षा काहीसे सुस्त असल्याचे चित्र आहे.



राज्यात तीन पक्षांनी स्थापन केलेले महाविकास आघाडीचे सरकार कामाला लागले असले तरी पूर्वीच्या फडणवीस सरकारच्या तुलनेत नवीन सरकारचा वेग कमी आहे
. पहिल्या दोन महिन्यांत उद्धव सरकारने १३ मंत्रिमंडळ बैठकांत २४ निर्णय घेतले. त्यापैकी जुन्या सरकारच्या ४ निर्णयांना स्थगिती देण्यासंबंधीचे होते. फडणवीस सरकारमध्ये पहिल्या २ महिन्यांत ११ मंत्रिमंडळ बैठका झाल्या. त्यात २५ नवेकोरे निर्णय घेण्यात आले. जुन्या सरकारच्या निर्णयांना त्यात स्थगिती देण्यात आली नव्हती.




maharashtra government _1


शिवसेना
, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात सरकार स्थापन केले. २८ नोव्हेंबर, २०१९ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नेते म्हणून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे महायुतीचे सरकार होते. महायुतीचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर, २०१४ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पहिल्या दोन महिन्यांच्या कालावधीत दोन्ही सरकारच्या कामांचा वेग तपासला असता ठाकरे सरकारचा वेग काहीसा कमी असल्याचे समोर आले. मुख्यमंत्री सचिवालयातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले असता राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजाचा वेग विद्यमान सरकारपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते.

 

Powered By Sangraha 9.0