आरबीआयचे द्विमासिक पतधोरण जाहीर

06 Feb 2020 13:28:39
RBI_1  H x W: 0



व्याजदरात कपात नाही; रेपोरेटही कायम

मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांसाठी गुरुवारी रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. रिझर्व्ह बँकेच्या या पतधोरण आढावा समितीने रेपो दर कायम ठेवला आहे. पुढील दोन महिन्यांसाठी रेपो रेट ५.१५ टक्के राहणार असून, सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे.


रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची मंगळवारपासून द्विमासिक पतधोरण बैठक सुरू होती. पुढील महिन्यांसाठी रिझर्व्ह बँक काय धोरण अवलंबणार याकडे आर्थिक जगताचे लक्ष लागले होते. अखेर गुरूवारी रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. या बैठकीत पतधोरण आढावा समितीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली.


या बैठकीत पतधोरण आढावा समितीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली. किरकोळ वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था या पार्श्वभूमीवर आरबीआयने रेपो रेट ५.१५ टक्के कायम ठेवला आहे. त्यामुळे कर्जदारांना आहे त्याच व्याजदराने कर्जाची परतफेड करावी लागणार आहे.


रिझर्व्ह बॅंकेने डिसेंबरमधील पतधोरणाआधी सलग पाचवेळा बँकेने रेपो दरात कपात केली होती. मात्र बँकांनी व्याजदर कपातीला फारसा प्रतिसाद दिला नाही. पतधोरणातील व्याजदर स्थिर राहिल्याने गृह, वाहन आणि इतर कर्जदरात फार बदल झाला नाही. मात्र यावेळी महागाई आणि विकासदराबाबत चिंता व्यक्त करताना 'आरबीआय'ने व्याजदर स्थिर ठेवण्याला प्राधान्य दिले. बँकेने घसरत्या विकासदराबाबत चिंता व्यक्त केली आहे.


सध्या महागाई दर ७.९५ टक्के आहे. बँकांकडून यापूर्वीच्या पतधोरणातील व्याजदर कपातीला अपेक्षित प्रतिसाद देण्यात आलेला नाही. तर काही सदस्यांच्या मते विकासाला चालना देण्याबाबत अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पतधोरण समितीतील बहुतांश सदस्यांनी 'व्याजदर जैसे थे'च ठेवण्याच्या बाजूने कौल दिला.
Powered By Sangraha 9.0