केंद्रीय अर्थमंत्री मुंबईकरांशी साधणार संवाद

05 Feb 2020 21:46:46


nirmala sitaraman_1 



मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दि. ७ फेब्रुवारी रोजी मुंबई भेटीवर येणार आहेत. संसदेत १ फेब्रुवारीला सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१च्या विविध तरतुदींविषयी उद्योग क्षेत्रातले प्रतिनिधी, व्यापार संघटना, इन्व्हेस्टमेंट बँकर्स आणि शेतकरी संघटनांची वित्तमंत्री भेट घेणार आहेत. अर्थतज्ज्ञ, करसल्लागार संघटना, वित्तीय आणि लेखा कंपन्या, व्यावसायिक संघटना, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशीही अर्थसंकल्पातल्या वैशिष्ट्यांविषयी वित्तमंत्री तपशीलवार संवादात्मक सत्र घेणार आहेत.



वित्तीय सेवा
, आर्थिक घडामोडी, व्यय, महसूल विभागांचे सचिव आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ यांचे अध्यक्षही वित्तमंत्र्यांसमवेत या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहू इच्छिणार्‍या संघटनांना आयकर आयुक्त (प्रशासन आणि करदाता सेवा) आयकर भवन, चर्चगेट, मुंबई इथे mumbai.cit.co.admin@incometax.या ईमेलवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0