शाहीन बाग आंदोलनात चिमुकल्याने गमावला जीव

04 Feb 2020 14:10:29
shaheen bagh_1  



आई-वडिलांच्या हलगर्जीपणामुळे ४ महिन्याच्या बाळाचा मृत्यू



नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शाहीन बाग येथे सुरू असलेल्या आंदोलनात चार महिन्यांच्या चिमुकल्याने थंडीमुळे आपला जीव गमावला. आंदोलक आई-वडील या चिमुकल्याला घेऊन दररोज आंदोलनस्थळी येत होते. पण थंडी सहन न झाल्यामुळे या चिमुकल्याने प्राण गमावले. दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी आहे. पण या थंडीतही शाहीन बागेत सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे.


शाहीन बागेतील आंदोलनात थंडीमुळे या बाळाला सर्दी आणि कफ झाला होता. श्वसनाचा त्रास होऊन मोहम्मद नावाच्या या बाळाने आपला जीव गमावला. आंदोलन आमच्या मुलांच्या भविष्यासाठी असल्याचे सांगत या माता-पित्यांनी शाहीन बागेतच ठाण मांडण्याचा निर्धार केला आहे.


मृत मोहम्मदचे आई-वडील नाजिया आणि आरिफ हे बाटला हाऊस परिसरातील झोपडपट्टीत राहतात. मूळ उत्तर प्रदेशातील असलेल्या या जोडप्याला पाच वर्षांची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा आहे. आरिफ हे दिल्लीत ई-रिक्षा चालवतात, तर त्यांची पत्नी घरकाम करते. या जोडप्याने सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शाहीन बागेत ठाण मांडले आहे.
Powered By Sangraha 9.0