शरजीलच्या ५१ समर्थकांवर गुन्हा दाखल

    दिनांक  04-Feb-2020 09:56:12
|

sharjeel imam_1 &nbs
 
मुंबई : मुंबईमध्ये आझाद मैदानावर देशद्रोहाचा आरोप असलेले शरजील इमाम याच्या समर्थनासाठी घोषणाबाजी झाल्याचा व्हिडियो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणला होता. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून ५१ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयोजकांशी चौकशी करून सभेमध्ये भाग घेतलेल्या मुलांचा शोध सुरु केला आहे. त्यामुळे आता हळूहळू यामध्ये कोणाकोणाची समावेश होता हे लवकरच स्पष्ट होईल.
 
 
दोन दिवसांपूर्वी शनिवारी मुंबईच्या आझाद मैदानावर 'मुंबई प्राइड सॉलिडॅरिटी गॅदरिंग २०२०' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान तेथे उपस्थित काही लोकांनी शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये काही लोक हातात फलक आणि बॅनर घेऊन घोषणा देत आहेत. याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाब विचारला होता.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.