हिंगणघाटमध्ये सर्वपक्षीय आंदोलन ; प्राध्यापिकेची प्रकृती अजूनही चिंताजनक

    दिनांक  04-Feb-2020 11:17:35
|

hinganghat_1  H

आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी

वर्धा : सोमवारी एका प्राध्यापिकेला भर रस्त्यात जाळण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला. सध्या आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्या येणार आहे. या सर्व प्रकरणाबद्दल मंगळवारी हिंगणघाटमध्ये कडेकोट बंद पाळण्यात आला. तसेच, सर्वपक्षीय तरुणांनी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत आंदोलने करण्यात आली. शिक्षक, विद्यार्थी यांनी त्याला भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
 
हिंगणघाटमधील तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाला. यानंतर संपूर्ण राज्यभरातून संतापाची तीव्र लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी शहरात मोर्चे काढण्यात आले. तसे संपर्ण शहर बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील विद्यार्थीही या मोर्चात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये पीडित प्राध्यापिकेच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींचाही समावेश आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्यामुळे तरुणी ३०-३५ टक्के भाजली गेली. यावेळी नाका-तोंडात धूर जाऊन त्या तरुणीला श्वसनाचा त्रास होऊ लागला. घटनेनंतरच्या दुसऱ्या दिवशीही तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसत नसून अधिकाधिक खालावत असल्याची माहिती देण्यात येत आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.