ओवेसी पण हनुमान चालीसा पठन करताना दिसतील : योगी आदित्यनाथ

04 Feb 2020 16:05:43

owesi _1  H x W



नवी दिल्ली
: दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस अधिक पेटते आहे. आज अरविंद केजरीवाल यांच्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकास्त्र सोडले आहे. यादरम्यान त्यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही निशाणा साधला आहे. “दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ येते आहे तसे अरविंद केजरीवाल हनुमान चालीसा गाताना दिसत आहेत. तो दिवस दूर नाही ज्यादिवशी असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालीसा पठन करताना दिसतील”, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हंटले आहे.


Powered By Sangraha 9.0